Pune Crime | 32 वर्षीय महिलेशी 7 महिन्यांपासून अश्लिल आणि नको ते चाळे; घाणेरडे कृत्य करणारा मॅनेजर ‘गोत्यात’

पुणे :  Pune Crime | गोडावूनमध्ये काम करणार्‍या महिला कामगाराशी कामाचे निमित्त करुन जवळीक साधून गेली ७ महिने तो अश्लिल आणि नको ते चाळे करायचा. त्याच्या या वर्तनामुळे त्रासलेल्या महिलेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) या मॅनेजरला अटक केली (Pune Crime) आहे.

मंगेश बादोले Mangesh Badole (वय ३४, रा. मंतरवाडी, उरुळी देवाची) असे या मॅनेजरचे नाव आहे. हा प्रकार मंतरवाडी येथील एका गोडावूनमध्ये फेब्रुवारी ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला. याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकाच कंपनीत कामाला असून फिर्यादी या कामगार तर, आरोपी हा मॅनेजर आहे. त्याने मॅनेजर असल्याचा गैरफायदा घेत कामाचे निमित्त करुन फिर्यादी यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयतन केला. वारंवार हात धरणे, मांडीला हात लावणे, अंगावर हात फिरवणे, पाठीवर हात फिरवणे असे कृत्य करुन फिर्यादीच्या शरीराशी चाळे करुन फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत होता. ११ सप्टेंबर रोजी त्याने पुन्हा असेच करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला विरोध केल्याने त्याने शिवीगाळ करुन विनयभंग केला. या घटनेने महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी मॅनेजरला अटक (Pune Crime) केली आहे.

हे देखील वाचा

Thane Gang Rape | 8 महिन्यापर्यंत प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी केला गँगरेप, 33 जणांवर गुन्हा दाखल, 26 जणांना पोलिसांकडून अटक

Overripe Banana side effects | अशाप्रकारची केळीचं सेवन केल्यास फायद्याऐवजी होते मोठे नुकसान, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | loni kalbhor police arrest manager who doing wrong thing with lady working his office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update