Pune Crime | पहिल्या पतीपासूनच्या मुलांना पैसे पाठविण्याच्या कारणावरुन पत्नीचा डोक्यात दगड घालून खून; लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांना कामातून मिळालेले पैसे पाठवित असल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून (Murder In Pune) केला. (Pune Crime)

 

गोमती भोपाली केवट (वय ४९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) तिचा पती मुरली चैनु केवट (वय ३६, रा. संदीप रोझ नर्सरी, सोरतापवाडी) याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत अमर काळुराम पांगारकर (वय ४७, रा. महादेवनगर, सोरतापवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर पांगारकर यांचे सोरतापवाडी येथे संदिप रोझ नर्सरी आहे. या नर्सरीमध्ये गोमती व मुरली केवट हे काम करतात. नर्सरीच्या जवळच पत्र्याच्या शेडमध्ये ते रहात होते. मुरली हा गोमतीचा दुसरा पती आहे. तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुले मध्य प्रदेशात Madhya Pradesh (MP) असतात. येथील कामाचे पैसे ती या मुलांना पाठवत होती. त्यावरुन त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत असत. रविवारी रात्री साडेदहा वाजता त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. तेव्हा मुरली याने गोमती हिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. याची माहिती अमर पांगारकर यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी मुरली केवट याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड (PSI Sadashiv Gaikwad) तपास करीत आहेत.

 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हयातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Web Title :- Pune Crime | Loni Kalbhor Police Husband Murder Wife Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा