Pune Crime | सराईत वाहन चोर लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड, 4 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर आणि परिसरात वाहन चोरी (Vehicle theft) करणाऱ्या सराईत चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या 4 दुचाकी जप्त करुन चार गुन्हे (Pune Crime) उघडकीस आणले आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor police Station) ही कारवाई दिवे घाटात केली.

 

कैलास मिठु कदम (वय-26 रा. नायगांव पेठ, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station), मार्केटयार्ड (Market Yard Police Station), तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade Police Station) आणि बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न (Pune Crime) झाले आहे.

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरांचा शोध घेत असताना तपास पथकाला एक व्यक्ती दिवे घाटात (Dive Ghat) संशयित रित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे असलेली दुचाकी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil) , सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते (ACP Kalyanrao Vidhate) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi), पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale), सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे (API Digambar Bidwe), राजु महानोर (API Raju Mahanor),  पोलीस हवालदार नितीन गायकवाड, शंकर नेवसे, संभाजी देवीकर, महेश भोंगळे, वणवे, हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, दिपक सोनवणे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Loni Kalbhor Police station seize 4 two wheelers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parambir Singh | ‘परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई सुरू’ !

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune Crime | कोथरुड, हडपसरमधील 4 सराफांना महिलेने घातला गंडा

Avoid Fake Fastag | ऑनलाईन विकला जातोय बनावट Fastag, सरकारने सांगितले बचावाची पद्धत

Mumbai School Reopen | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय ! ‘मुंबईत उद्यापासून शाळा सुरु होणार नाहीत, तर…’