Pune Crime | सराईत तडीपार गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातून तडीपार (Tadipar) करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) तपास पथकाने (Investigation Team) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या प्रणव भारत शिरसाट (Pranav Bharat Shirsat) याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त (DCP) यांनी ऑगस्ट 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून (Pune Crime) दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर मुंबई पोलीस कायदा (Mumbai Police Act) कलम 142 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

प्रणव भारत शिरसाट (वय – 21 रा. आंग्रे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना तडीपार आरोपी प्रणव शिरसाट हा हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन सापळा रचून अटक केली. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor), पोलीस हवालदार संतोष होले, पोलीस शिपाई राजेश दराडे यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Lonikalbhor police arrest criminal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा