Pune Crime | मौजमजेसाठी 43 लाख चोरणाऱ्या रोखपालाला लोणीकंद पोलिसांनी गोव्यातून केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | होलसेल किराणा मालाची (Wholesale Groceries) विक्री करणाऱ्या लोणीकंद येथील जम्बोटेल टेक्नॉलॉजी कंपनीचे (Jumbotel Technology Company) 43 लाख रुपये चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) रोखपाल विरुद्ध (Cashier) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन लोणीकंद पोलिसांनी अवघ्या चार दिवसात आरोपीला बेड्या ठोकल्या (Pune Crime) आहेत. पुष्कर निनाद संगमनेरकर Pushkar Ninad Sangamnerkar (वय – 29 रा. रास्तापेठ, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या रोखपालाचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी आरोपीला गोवा (Goa) येथून अटक केली.

 

कंपनीचे 43 लाख रुपये चोरून पळून गेलेला आरोपी पुष्कर संगमनेरकर हा गोवा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार (API Nikhil Pawar), पोलीस कर्मचारी अजित फरांदे (Ajit Farande), अमोल ढोणे (Amol Dhone) यांनी गोवा येथून आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 41 लाख 400 रुपये जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime)

ही कारवाई लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar), पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे (Police Inspector Rajesh Tatkare), पोलीस निरीक्षक मारुती पाटील (Police Inspector Maruti Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव (API Gajanan Jadhav), पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे (PSI Suraj Gore), कैलास साळुंके, विनायक साळवे, सुधीर अहिवळे, सागर शेडगे, बाळासाहेब तनपुरे, मोहन वाळके, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने यांनी ही कामगिरी केली.

 

Web Title :- Pune Crime | Lonikand Police Arrest Jumbotel Technology Company Cashier

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा