Pune Crime | पुण्याच्या लोणीकंदमधील बाप-लेकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक; नानासाहेब शिंदे यांच्या सांगण्यावरुन हल्ला, जाणून घ्या हत्येचं कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोणीकंद (Lonikand) येथे टोळीयुद्धातून (Gangwar in Pune) झालेल्या बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) तिघांना अटक केली आहे.
प्रतिक अनिल कंद Pratik Anil Kand (वय २८), नानासाहेब बाबुराव शिंदे Nanasaheb Baburao Shinde (वय ६५) आणि आशितोष नानासाहेब शिंदे Aashitosh Nanasaheb Shinde (वय ३२, सर्व रा. लोणीकंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

याशिवाय  निखिल पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखिल नितीन जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वागळे व इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी सचिन नानासाहेब शिंदे (Sachin Nanasaheb Shinde) याचा गोळीबार करुन खून (Murder in Pune) करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्या खूनातील जामिनीवर सुटलेल्या सनी शिंदे (Sunny Kumar Shinde) व त्याचे वडिल कुमार मारुती शिंदे Kumar Maruti Shinde (वय ५०) यांच्यावर कोयता, दांडके व दगडाने मारहाण करुन त्यांचा बुधवारी सायंकाळी निर्घुण खून करण्यात आला होता. या हल्ल्यात मिनल सचिन शिंदे Minal Sachin Shinde (वय २७) आणि कारचालक ज्ञानेश्वर ज्ञानबा चव्हाण (वय ४४) हेही जखमी झाले आहेत. (Pune Crime)

सचिन नानासाहेब शिंदे आणि सचिन किसन शिंदे हे दोघेही चुलत भाऊ होते. लोणीकंद, शिक्रापूर (Shikrapur) परिसरात दोघांमध्ये वर्चस्वातून टोळीयुद्ध सुरु झाले. त्यातूनच गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२१मध्ये गोल्डमॅन सचिन नानासाहेब शिंदे (Goldman Sachin Nanasaheb Shinde) याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणात सचिन किसन शिंदे (Sachin Kisan Shinde) याच्यासह १२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील सनी शिंदे याच्यासह काही जणांना जामीन मिळाला. सनी शिंदे याचा भाऊ सचिन शिंदे याच्या जामिनावर बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात (Shivaji Nagar Court) सुनावणी होती. त्यासाठी सनी, त्याचे वडिल कुमार, भावजयी मिनल शिंदे व चालक ज्ञानेश्वर चव्हाण हे कारने पुण्यात आले होते. मात्र, जीवाच्या भितीने जामीन मिळालेले इतर पुण्यात आले नव्हते. सुनावणी झाल्यानंतर ते कारने लोणीकंदला जात होते.

तेव्हापासून हल्लेखोर त्यांचा पाठलाग करीत होते.  लोणीकंदमधील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ नानासाहेब शिंदे व त्याच्या टोळक्यांनी गाडी आडवी घालून त्यांना थांबविले. दोन गाड्यातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथमेश ऊर्फ सनी याच्यावर कोयत्याने वार करुन व दगडाने मारून त्याचा खून केला. त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेले त्याचे वडिल कुमार यांच्यावरही त्यांनी वार केला. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला.
मिनल शिंदे व ज्ञानेश्वर चव्हाण यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

 

सचिन शिंदे याचा गेल्या वर्षी झालेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी नानासाहेब शिंदे याच्या सांगण्यावरुन हा खून करण्यात आला आहे.
त्यामुळे आता पुन्हा टोळीयुद्ध पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.

Web Title : Pune Crime | Lonikand Police arrested three in double murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात