Pune Crime | दिवाळीत शहरात लुटमारीच्या घटना; तरुणाला धमकावले, ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

पुणे : Pune Crime | दिवाळीत (Diwali Festival ) शहरात बुधवार पेठेत एका तरुणाला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाईल हिसकावून नेला. चंदननगर भागात एका तरुणाला मारहाण (Beating) करुन साडेतीन हजारांची रोकड लुटण्यात आली. (Pune Crime)

याप्रकरणी नरेंद्र बुद्धीसिंह Narendra Budhisingh (वय २७, रा. साडेसतरानळी, हडपसर) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. नरेंद्र आणि त्याचा मित्र पहाटे चारच्या सुमारास बुधवार पेठ परिसरातून जात होते. त्यावेळी तीन चोरट्यांनी दोघांना अडवले. एका मोटारीच्या काचेवर दगड मारला. त्यामुळे नरेंद्र आणि त्यांच्याबरोबर असलेला मित्र घाबरला. चोरट्यांनी दोघांना मारहाण करुन त्यांच्याकडील १५ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.

चंदननगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्याच्याकडील साडेतीन हजारांची रोकड लुटणार्‍या चोरट्यांना पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

विजय भास्कर गायकवाड Vijay Bhaskar Gaikwad (वय २१) आणि विकास रमेश गायकवाड Vikas Ramesh Gaikwad (वय २५, दोघे रा. आंबेडकर वसाहत, चंदनगनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मध्यरात्री एकच्या सुमारास वडगाव शेरी
(Vadgaon Sherry, Pune) भागातून पायी जात होता. या वेळी चोरट्यांनी सिगारेट मागण्याच्या बहाण्याने
त्यांना अडवले. त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले.
चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पालवे (Sub-Inspector of Police Palve) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Looting incidents in the city during Diwali; A youth was threatened, a senior citizen was robbed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस; सदस्यांनी विचारले प्रश्न, म्हणाल्या – ‘हे आहेत महाराष्ट्राचे दोन कॅप्टन’

NCP MLA Nilesh Lanke| राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान