Pune Crime | बनावट ई मेलआयडीद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची बदनामी करुन दीड कोटींचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कंपनीच्या नावाशी मिळते जुळते असलेले ई मेल आयडी (email ID) तयार करुन त्याद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची (EPPS Infotech Pvt. Ltd) बदनामी (Defamation) करुन कंपनीचे दीड कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी गायत्री सुरेशकुमार पिल्ले (वय २५, रा. ईपीपीएस इन्फोटेक, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप परमार (Sandeep Parmar) Mob No. 7042272764 याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप परमार याने ईपीपीएस इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीचे नावाशी मिळते जुळते असलेला ई मेल आयडी तयार करुन तो मेल आयडी फिर्यादीच्या कंपनीचा असल्याचे भासविले (Pune Crime). त्याद्वारे आपली स्वत:ची ओळख लपवून कंपनीची बदनामी व्हावी, असा मजकूर असलेले मेल कंपनीचे कर्मचारी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक, कंपनीचे मालक, कंपनीचे ग्राहक कंपनीचे डीलर्स, कंपनीचे पाटनर्स यांना पाठविले. त्याद्वारे त्यांच्या मनात कंपनीचे आर्थिक व्यवहाराबद्दल भिती निर्माण केली. बदनामीकारक ई मेल पाठवून त्याद्वारे अंदाजे दीड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Loss of Rs 1.5 crore by defaming EPPS Infotech Company through fake e-mail ID FIR In Viman Nagar Police Station


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा