Pune Crime | दुर्दैवी ! पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा, कारसह पती-पत्नी थेट विहिरीत, पत्नीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीला कार शिकवत असताना कारवरील ताबा सुटल्याने (Out of control) कारसह पती-पत्नी (Husband and wife) विहिरीत (well) पडून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिरुर तालुक्यातील (Shirur taluka) करंदी येथे आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्यातील (Shikrapur Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

वर्षा दिपक आदक Varsha Deepak Adak (वय-30 रा. शेखर हाईट्स सोसायटी, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिपक प्रभाकर आदक Deepak Adak (वय-36) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दिपक हे कार घेऊन पत्नी वर्षा हिला कार शिकवण्यासाठी (driving) केंदूर रस्त्यावरील करंदी गावातील पऱ्हाडवाडी रोडवर गेले होते. त्यावेळी समोरून दुचाकी आल्याने त्यांनी पत्नीला ब्रेक दाबण्यास सांगितले. मात्र पत्नीने ब्रेक (Break) दाबण्याऐवजी एक्सीलेटरवर (Accelerator) पाय दिल्याने कारवरील ताबा सुटला. (Pune Crime)

कारवरील ताबा सुटल्यानंतर गाडी शेजारील विहिरीत जाऊन कोसळली. दिपकने तातडीने वर्षाच्या बाजूच्या काचेतून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र तिला बाहेर येताच आले नाही. त्यामुळे दिपकने बाहेर येऊन पत्नीला बाहेर ओढून काढले.
त्यानंतर दिपकने पाईपला पकडून मोठमोठ्याने आरडाओरडा केला.
दिपकचा आवाज ऐकून रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी दोघांना बाहेर काढले. मात्र, वर्षाचा जागीच मृत्यू झाला होता.

 

घटनेची माहिती मिळताच करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे,
पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक विकास पाटील, राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप कारंडे व विकास पाटील करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | lost control while teaching car wife husband and wife car well unfortunate death wife husband is injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 71 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Android Update Alert | आपला अँड्रॉईड फोन तात्काळ करा अपडेट, सरकारी सिक्युरिटी एजन्सीने दिला इशारा; जाणून घ्या

Pune School Reopan | पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग गुरुवारपासून सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती (व्हिडिओ)