Pune Crime | पुण्यातील महिलेसोबत ‘लफडं’ ! भोरमधील 29 वर्षीय तरुणाची आत्महत्या; हॉटेल व्यावसायिकासह महिलेविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बुधवार पेठेतील (Budhwar Peth) कुंटणखात्यात वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणावरुन त्रास दिला जात असल्याने एका २९ वर्षाच्या तरुणाने आत्महत्या (Suicide in Pune) केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

वाल्मिकी भगवान माने Valmiki Bhagwan Mane (रा. धायरी) व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कात्रज (Katraj News) येथील मांगडेवाडी (Mangdewadi News) येथे घडला होता.

याप्रकरणी भोर येथे राहणार्‍या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या लहान भावाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला अशोक (नाव बदलले आहे) व वाल्मिकी माने हे हॉटेल व्यवसायत भागीदार होते. ते एक रेस्टॉरंट चालवत होते. अशोक याचे बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलेसोबत प्रेम संबंध होते. त्यावरुन वाल्मिकी व ही महिला हे अशोकला त्रास देत असत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे फिर्यादीत (Pune Crime) म्हटले आहे.

 

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (senior police inspector jagannath kalaskar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | love affair with a woman from Pune! The suicide of a 29-year-old man in Bhor; Crime against a hotelier Valmiki Bhagwan Mane and a woman at Bharati University Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Koregaon Bhima Commission | कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला अहवाल सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ

Pune Crime | पुण्यात साडेसात लाखांच्या कर्जाचे मागितले 22 लाख; येवलेवाडीमध्ये बेकायदा सावकारी करणार्‍या आशिष पाटणेविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

Aadhaar Card Update | बाळ जन्माला येताच बर्थ सर्टिफिकेटच्या अगोदर मिळेल आधार कार्ड, जाणून घ्या होणार कोणते बदल

ST Workers Strike | ‘माझ्या संपकरी एसटी कर्मचार्‍यांनो…विलीनीकरणाचे डोक्यातून काढून टाका’ – अजित पवार

Omicron Variant Symptoms | सर्दी-ताप आल्यास नका करू दुर्लक्ष; ‘हे’ आहेत ओमायक्रॉनची 2 भिन्न लक्षणे, जाणून घ्या

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1410 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bank Holidays List | जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पाहून घ्या सर्व सुट्ट्यांची यादी