Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार; लग्नाचा आग्रह धरल्यावर फिनेल पाजून केला मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारिरीक संबंध (Physical Relation) प्रस्तापित केले. त्यानंतर या तरुणीने लग्नाचा आग्रह धरल्यावर तरुणाने व त्यांच्या नातेवाईकांनी फिनेल पाजण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी धानोरी (Dhanori) येथे राहणार्‍या ३३ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७५/२२) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कनिष्क तिवारी (वय २७), तुषार दहिया (वय २७), अनमोल पोरवाल (तिघे रा. मध्य प्रदेश) आणि आयुष साडु (रा. नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ जानेवारी ते २१ मार्च २०२२ दरम्यान धानोरीतील कलवड वस्तीत घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्क तिवारी याने फिर्यादी यांना लग्नाचे अमिष दाखवून त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याला लग्नाचा आग्रह केल्यावर आरोपींनी अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. कनिष्क तिवारी याने फिर्यादीला हाताने मारहाण करुन फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला. आमच्याविरुद्ध कोठे तक्रार केली तर त्यांचेकडे असलेले फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची सर्वांनी धमकी दिली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुळुक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | lure of marriage rape case against kanishka tiwari chandan nagar police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त