Pune Crime | कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेला 2 लाखांचा गंडा; दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कर्ज मिळविण्यासाठी एका फायनान्स कंपनीकडे अर्ज केला असताना सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून त्यांना २ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

याप्रकरणी पर्वती (Parvati Hill Pune) येथील एका ४० वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजयकुमार, दयाशंकर मिश्रा, देबुदास, रुद्र प्रताप अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२० ते मे २०२२ दरम्यान घडला. फिर्यादी यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी बजाज फायनान्स कंपनीकडे (Bajaj Finance Company) कर्जासाठी ऑनलाईन अर्ज (Online Loan Application) नोव्हेंबर २०२० मध्ये केला होता. त्यानंतर संजयकुमार असे नाव सांगणार्‍या आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन कर्जासाठी प्रोसेसिंग (Processing Fees) फी म्हणून ४ हजार रुपये साऊथ इंडया बँकेचे खात्यात भरायला सांगितले. (Pune Crime)

त्यानंतर दयाशंकर मिश्रा याने जीएसटी, टीडीएम व एनओसी करीता ६० हजार रुपये भरायला सांगितले. देबुदास याने लेट फी व प्रोसेसिंग फि करीता फिर्यादीकडून वेळोवेळी त्यांचे गुगल पेच्या (Google Pay) खात्यावर पैसे टाकायला लावले. वारंवार फोन करुन पैशांची मागणी करुन फिर्यादी यांना कोणतेही कर्ज न देता त्यांची २ लाख २ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक खोमणे (Police Inspector Khomne) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Lure Of Online Loan 2 Lacs Cheating Fraud Case Dattawadi Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर