Pune Crime | गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक ! परदेशी निघालेल्या एम. जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी, पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली एअरपोर्टवर पकडलं; दाम्पत्यास ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाचे पुण्याकडे ‘प्रयाण’

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch Police |  गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक (anti extortion cell) दोनच्या पोलिसांनी दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) ताब्यात घेतले आहे. सोमजी दाम्पत्य हे श्रीलंका मार्गे कॅनडला पळून जाण्याच्या तयारी होते, अशी माहिती समोर आली आहे.

 

अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil Somji), डिंपल अलनेश सोमजी Dimple Alnesh Somji (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुण्यातील अनेकांना वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याच्या बहाण्याने गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. शुक्रवारी (दि.29 ऑक्टोबर) सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. आज या दोघांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने ताब्यात घेतले. आरोपींना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर याची माहिती पुणे पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक दिल्ली येथे रवाना झाले आहे. पथकाने कायदेशीर कारवाई करुन दाम्पत्याला ताब्यात घेतले असून त्यांना पुण्यात आणले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने केली.

काय आहे प्रकरण ?

योगेश विष्णु दिक्षीत Yogesh Vishnu Dixit (वय-41 रा. नाना पेठ) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दाखल केली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह इतर दोघांची तब्बल 3 कोटी 37 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला एम.जी. एन्टरप्रायजेस या फर्ममध्ये पैसे गुंतवल्यास त्या रकमेवर 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीवर विश्वास ठेवून 45 लाख रुपये गुंतवले. ही रक्कम डिंपल सोमजी यांच्या बँक खात्यावर जमा केले.

 

फिर्यादी यांनी जमा केलेल्या 45 लाखावर 21 लाख 90 हजार असे एकूण 66 लाख 90 हजार रुपये देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले.
मात्र, आरोपींनी त्यांना परतावा आणि मुद्दल न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.
याशिवाय आरोपींनी किरण शेट्टी यांची 57 लाख 33 हजार आणि माया चावला यांची 1 कोटी 22 लाख 25 हजार
रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

पैशांची मागणी करुन देखील पैसे मिळत नसल्याने फिर्यादी यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता.
तक्रारीची चौकशी करुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथक (anti extortion cell)
दोनचे पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan) करीत आहेत.


Web Title :- 
Pune Crime | M.G. enterprises cheated Billions of investors in pune, Alnesh Somji and wife Dimple Somji caught at Delhi Airport; Couple arrested, Crime Branch team leaves for Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 WC | पराभवानंतर विराट कोहलीच्या कुटुंबाला मिळतेय धमकी? ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाने व्यक्त केली नाराजी

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात ‘कोरोना’ रुग्णांची संख्या हजाराच्या आत, गेल्या 24 तासात 1901 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! फ्रेन्डस् इलेव्हन संघाची विजयी सलामी; वैंकिज् इलेव्हनचा दणदणीत विजय