Pune Crime | मॅडम ! आप बहुत डॅशिंग दिखते हो मुझे अपने उम्रसे बडी औरते पसंद है ! सामाजिक कार्यकर्तीचा कॉफी शॉपमध्ये विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | एका सामाजिक कार्यकर्तीला (Lady Social Worker) दोराबजी मॉलच्या (Dorabjee Pune) कॉफी शॉपमध्ये (Coffee Shops In Pune) भेटून ‘आप बहुत डॅशिंग दिखते हो, मूझे अपने उम्र से बडी औरते पसंद है,’’ असे बोलून अश्लिल हावभाव (Obscene Gestures) करुन विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) हर्षवर्धन चौधरी Harshvardhan Chaudhary (रा. विश्वजीत अपार्टमेंट, डावी भुसारी कॉलनी – Left Bhusari Colony, कोथरुड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी मांजरी (Manjari Pune) येथे राहणार्‍या ५२ वर्षाच्या सामाजिक कार्यकर्तीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२२) दिली आहे. हा प्रकार कॅम्पमधील दोराबजी मॉल येथील कॉफी शॉपमध्ये जुलै २०२० मध्ये घडला होता. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅपवर (WhatsApp) आतापर्यंत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या सहकार्‍यांसोबत दोराबजी मॉलमधील कॉफी शॉपमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी हर्षवर्धन चौधरी तेथे आला. त्यांना अश्लिल हावभाव करुन ‘‘आप बहुत डॅशिंग दिखते हो, मुझे अपने उम्र से बडी औरते पसंद है’’ असे बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या व्हॉटसअ‍ॅपचा वापर करुन फिर्यादीच्या NGO ची बदनामी (Defamation) केली. फिर्यादीवर चोरीचे आरोप केले आहेत. तसेच फिर्यादीचे सहकार्‍यांना शिवीगाळ केली. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून त्यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा प्रकार दोराबजी मॉलमध्ये घडल्याने गुन्हा लष्कर पोलीस ठाण्यात (Lakshar Police Station) वर्ग केला आहे.

Web Title : Pune Crime | Madam! You look so dashing I like women older than my age!
Harassment and Molestation of a social worker in a Dorabjee coffee shop Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा