Pune Crime | पुण्यात पोलिस अधिकार्‍याच्या (कारागृह) 21 वर्षीय मुलाचा निर्घृण खून, एका मुलीसह 5 जणांवर पोलिसांचा संशय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलाच्या कारागृह विभागात कार्यरत असणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय मुलाचा निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना हडपसर (Hadapsar) येथील ग्लायडिंग सेंटर (Gliding Center) येथे मंगळवारी (ता.24) संध्याकाळी साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गिरीधर उत्रेश्वर गायकवाड Giridhar Utreshwar Gaikwad (वय-21) असे खून झालेल्या (Pune Crime) तरुणाचे नाव आहे. (Murder In Pune)

याबाबत मृताचा भाऊ निखिलकुमार उत्रेश्वर गायकवाड Nikhil Kumar Utreshwar Gaikwad (वय-27) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. हा खून एका तरुणीसह (Young Lady) पाच जणांनी केल्याचा संशय आहे. मृत गिरीधर गायकवाड (रा. गोपाळपट्टी, पार्क साई टॉवर मांजरी मुळ रा. उरुळी कांचन-Uruli Kanchan) याचे वडील उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) जेलर (Jailor) म्हणून कार्यरत आहेत. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत गिरीधर हा मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घरी बसला होता. त्यावेळी त्याला एका मुलीचा फोन आला. त्यानंतर तो घराबाहेर पडत असताना भाऊ निखीलकुमार याने कोठे जात आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने मैत्रिणीचा फोन आल्याचे सांगून अर्ध्यातासात तिला भेटून परत येतो असे सांगितले. बराचवेळ झाला तरी गिरीधर घरी परत न आल्याने आईने भाऊ काळजीत असताना वडील उत्रेश्वर गायकवाड यांनी फोन करुन गिरीधरचा खून झाल्याची माहिती निखील व त्याच्या आईला दिली.

गिरीधरचा खून झाल्याचे समजताच निखील आणि त्याच्या आईने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गिरीधर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात गिरीधरचा खून एका मुलीने व तरुणांनी केल्याचे समजले. पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलाचा खून झाल्याचे समजताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नसून हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | maharashtra police officer’s (prison) 21-year-old boy’s brutal
murder in pune, police suspect 5 people including a girl

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त