Pune Crime | सोमेश्वरवाडीतील महाशिवरात्री यात्रेत मुलांचा हत्यारासह ‘राडा’; टोळीतील तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महाशिवरात्रीला (Mahashivaratri) पाषाण येथील सोमेश्ववाडी येथे मोठी यात्रा भरत असते. या यात्रेला लांबून लांबून लोक येत असतात. यात्रेत झोके, पाळणे असतात. या पाळण्यात बसण्याकरीता असलेल्या रांगेत मुलांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीतून सहा जणांनी कोयते, चाकू काढून दोघांना गंभीर जखमी केले तर अन्य तिघांना लाकडी दांडक्याने व हत्याराने मारहाण (Beating) केली. हा घटना महाशिवरात्रीच्या दिवशी सोमेश्वर मंदिरासमोर (Someshwar Temple) रात्री साडेआठ वाजता घडली. चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police) तिघांना अटक (Arrest) केली असून त्यांच्या ३ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)

 

दिगंबर आसाराम खराबे Digambar Asaram Kharabe (वय २६, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निखील प्रकाश डोंगरे Nikhil Prakash Dongre (वय १९), तन्मय राजेश शितोळे (Tanmay Rajesh Shitole) (वय १८), निकेश रघुनाथ शेलार Nikesh Raghunath Shelar (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे मित्र व आरोपी हे सोमेश्वर मंदिर येथील यात्रेमध्ये पाळण्यामध्ये बसण्याकरीता रांगेत उभे होते. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या मुलांमध्ये धक्काबुक्की सुरु झाली. यावेळी खराबे यांचा भाऊ ज्ञानेश्वर याला आरोपी धक्काबुक्की करुन मारहाण करीत होते. हे पाहून फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले. तेव्हा निखील डोंगरे याने त्याच्याकडील हत्यार काढून फिर्यादीच्या डोक्यात मारले. तन्मय शितोळे याने चाकूने पोटात वार करुन गंभीर जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी यश नाथ, सोमनाथ शिंगाडे हे आले असताना आरोपींनी त्यांच्याकडील हत्याराने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांना जखमी केले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Mahashivaratri Yatra at Someshwarwadi; Three members of the gang were arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

‘या’ कारणामुळे तुमचे Demat Account 1 एप्रिल पासून बंद होणार, जाणून घ्या कारण

 

Amol Mitkari | ‘मलिकांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांनी लाड यांच्या कन्येच्या लग्नात कोणाशी हात मिळवला होता?’ – अमोल मिटकरी

 

Best Time To Drink Coffee | सकाळी-दुपार-संध्याकाळ कोणत्या वेळी कॉफी पिणे असते योग्य, अशाप्रकारे प्यायल्यात तर मिळतील फायदे