Pune Crime | ‘लिव्ह-इन’ मध्ये राहणाऱ्या तरुणाची स्वत:च्याच हाताने कटरने गळा चिरुन घेत आत्महत्या; पुण्यातील धायरी परिसरातील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लिव्ह इन रिलेशनशिप (Live in relationship) मध्ये राहत असलेल्या तरुणाने स्वत:च्याच हाताने कटरने गळा चिरुन घेत आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. ही घटना सिंहगड रोड परिसरातील धायरी (Dhairi) येथे घडली आहे. तरुणाने टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले हे समजू शकले नाही. मात्र नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) व्यक्त केली आहे.
महेश राजाराम तवंडे Mahesh Rajaram Tawande (वय-32 रा. ओम नम: सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा, धायरी, मुळ रा. कोल्हापूर-Kolhapur) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महेश हा पुण्यात ग्राफिक डिझाईनर (Graphic Designer) म्हणून काम करत होता. गेल्या एक वर्षापासून तो त्याच्या मैत्रिणीसोबत धायरी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. गणपती उत्सवासाठी (Ganpati Festival) त्याची मैत्रीण बाहेर गावी गेल्यानंतर महेशने टोकाचे पाऊल उचलले. (Pune Crime)
महेश याने शुक्रवारी दुपारी घराचा दरवाजा आतून बंद करुन घेत स्वत:च्याच हाताने शरीरावर आणि गळ्यावर कटरने वार केले. दुपारी घरमालकाला ओरडण्याचा आवाज आला मात्र तरुणाच्या घरातून नेहमीच ओरडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
रात्री घरमालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) माहिती दिली.
माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव (API Bharat Chandanshiv) आणि इतर कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आला.
पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठवला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Mahesh Gawande committed suicide by slitting his throat with his own hand shocking incident in dhayri sinhagad road police station pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार
Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी