Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ! इंदापूरमध्ये नाकाबंदी दरम्यान 32 लाखांचा गुटखा जप्त

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई करुन 32 लाखांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर पोलिसांनी (Indapur Police) पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) सरडेवाडी टोलनाक्याजवळ केली. इंदापूर पोलिसांकडून नाकाबंदी सुरु असताना एक वाहन न थांबता सोलापूरकडून (Solapur) पुण्याच्या दिशेने (Pune Crime) भरधाव वेगात निघून गेले. पोलिसांनी पाठलाग करुन गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 32 लाखाचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

गणेश आबासो चव्हाण Ganesh Abaso Chavan (वय-35 रा. शेटफळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) व गाडी मालक चंद्रकांत क्षीरसागर Chandrakant Kshirsagar (रा. बारामती, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि.23) रात्री एकच्या सुमारास इंदापूर बाह्यवळण (Indapur Bypass) महामार्गावर करण्यात आली.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते (Addl SP Milind Mohite)
यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे (Indapur Police Station)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर (Senior Police Inspector Tayyab Mujawar),
सहायक पोलीस निरीक्षक दाजी देठे (Daji Dethe), पोलीस नाईक मनोज गायकवाड,
पोलीस कॉन्स्टेबल फडणीस यांच्या पथकाने केली. (Pune Crime)

 

अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र अन्न सुरक्षा प्रतिबंधित कायदा व भारतीय दंड संहिता कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Major action of Pune rural police! 32 lakh gutka seized during blockade in Indapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा