Pune Crime | दहशतवादविरोधी पथकाची पुण्याच्या मालधक्का परिसरात मोठी कारवाई ! मुंबईहून आलेल्या तस्कराकडून १२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंबईहून पुण्यातील पुणे स्टेशन (Pune Railway Station) परिसरातील मालधक्का येथे आलेल्या एका तस्करावर दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terrorism Squad Maharashtra) कारवाई केली असून त्याच्याकडून १२ लाख रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी (मेफेड्रोन – Mephedrone) जप्त करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

महंमद फारुख महंमद उमर टाक Mohammad Farooq Mohammad Umar Tak (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी वेस्ट, मुंबई, मुळ रा. राजस्थान – Rajasthan) असे अटक (Arrest) केलेल्या ड्रग्ज तस्कराचे (Drug Smugglers) नाव आहे. याच्याकडून ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ आढळून आला. तसेच मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबीट कार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. (Pune Crime)

याबाबत दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकाकडून पुणे स्टेशनकडे जाणार्‍या रोडवरील फुटपाथवर एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने तेथे सोमवारी दुपारी सापळा रचला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पाठीला सॅक लावलेला एक तरुण फुटपाथवर संशयास्पदरित्या रेंगाळताना दिसला. तेव्हा साध्या वेशातील पोलिसांनी महंमद टाक याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११८ ग्रॅम एम डी सापडले. (Pune Crime)

 

याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक फारुख पेरणेकर (Police Constable Ashok Farooq Pernekar)
यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई पोलीस ठाण्यात (Mumbai Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक विश्वास भास्कर (PI Vishwas Bhaskar) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Major operation of Maharashtra ATS in Maldhakka area of Pune; 12 lakh drugs seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा