Pune Crime | गुंड संतोष जगतापच्या हत्येनंतर झळकला श्रद्धांजलीचा ‘फ्लेक्स’, पोलिसांनी केलं ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे गुंड संतोष जगताप (Santosh Jagtap) याचा गोळ्या घालून खून (Murder) करण्यात आला. संतोष जाधव याच्यावर पुणे ग्रामीण पोलीस (Rural Police) अधीक्षक कार्यालयांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. पूर्ववैमनस्यातून जगताप याचा खून (Pune Crime) करण्यात आला. या घटनेनंतर त्याला श्रद्धांजली (tribute) देणारा अनधिकृत फ्लेक्स सांगवी येथे लावण्यात आल्याने खळबळ उडाली. परंतु माळेगाव पोलिसांनी (Malegaon police) तो फ्लेक्स तातडीने हटवला.

संतोष जगताप याचा खून झाल्यानंतर बारामती तालुक्यातील सांगवी (Sangvi taluka Baramati) येथे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देणारा अनधिकृत फ्लेक्स (Unauthorized flex) लावण्यात आला. याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे (Malegaon Police Station) सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे (API Rahul Ghuge) यांना समजताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण रोखण्यासाठी त्यांनी बॅनर हटविण्याच्या सूचना देऊन फ्लेक्स काढून टाकला. यामुळे फ्लेक्स लावणाऱ्या तरुणांनी पोलिसांच्या या कारवाईचा चांगलाच धसका (Pune Crime) घेतला आहे.

संतोष जगताप हा गुंड प्रवृत्तीचा होता. वाळू व्यवसायातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील तो मुख्य आरोपी होता. अशा बॅनरबाजीमुळे तरुण मुलांची गुन्हेगारीकडे वाटचाल होत असते. याचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना फ्लेक्स बाबत माहिती समजताच त्यांनी तातडीने कारवाई करुन फ्लेक्स हटवला. यावेळी त्यांनी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांना बोलावून घेत यापुढे अशा प्रकारचे अनधिकृत फ्लेक्स न लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच परवानगीशिवाय फ्लेक्स लावू नयेत असेही सांगितले.

हे देखील वाचा

Pune Corporation GB | नाना पेठेतील ‘दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ संस्थेस 30 वर्षे भाडेकरार वाढीस मुदतवाढ;; सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय (Live Video)

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच नवाब मलिकांना उत्तर; म्हणाले – ‘जन्मदाखला माझ्या मूळ गावी जा आणि तपासा’

Pune Crime | लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून भरदिवसा खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | malegaon police of pune rural removed flex tribute gangster santosh jagtap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update