Pune Crime | खून झालेल्या मुलाच्या 16 लाखांच्या दागिन्यांचा अपहार करणार्‍यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खून झालेल्या मुलाच्या अंगावरील १६ लाख ५० हजार रुपयांचे दागिने सुरक्षित रहावे म्हणून त्याच्या वडिलांनी एकाकडे ठेवायला दिले होते. त्याचा अपहार करणार्‍यास भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) अटक केली आहे. (Pune Crime)

 

झाकीर हुसेन बाबु भोला (वय ३५, रा. आनंद मठसमोर, जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हुसेनसाब महंमदसाब मनुर (वय ६७, रा. आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा समीर ऊर्फ लाल बादशाह हुसेन मनुर याचा खून झाला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर १६ लाख ५० हजार रुपयांचे ५८ तोळे सोन्याचे दागिने होते. त्यांचा भाऊ नूर महंमद मनुर याने हे दागिने पोलिसांकडून घेऊन फिर्यादी यांना दिले होते. त्यांनी ते सुरक्षित ठेवण्यासाठी ६ डिसेंबर २०२१ रोजी झाकीर हुसेन बाबु भोला याच्याकडे दिले होते. फिर्यादी यांना पैशांची गरज भासल्याने त्यांनी हे दागिने भोला याच्याकडे परत मागितले. तेव्हा तो पळून गेला व लपून राहून दागिने परत न करता त्याचा अपहार केला. मनुर यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केल्यावर पोलिसांनी भोला याला अटक केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Man arrested for embezzling Rs 16 lakh jewelery from murdered boy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे पोलिसांना गुंगारा देणार्‍या गुंडाला कोल्हापूरात अटक; क्रिकेटच्या सामन्यात वेशांतर करुन मख्खनसिंह अजितसिंग कल्याणीला पोलिसांनी केले जेरबंद

 

R Ashwin Surpasses Legendary Kapil Dev | व्वा आश्विन व्वा ! आश्विनने मोडला कपिल देवचा विक्रम, सर्वाधिक बळींच्या यादीत मारली भरारी !

 

PM Modi Visit To Pune | Pune Metro चे PM मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; नरेंद्र मोदी म्हणाले – ‘पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार’