Pune Crime | लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास अटक

पुणे : Pune Crime | रस्त्यावरुन जाता येता छेडछाड करणे, पाठलाग करुन त्यांच्याविषयी अश्लिल भाषेत बोलणे असे असंख्य प्रकार रस्त्यावरील टोळके करताना दिसतात. या प्रकारामुळे अनेक तरुणींना रस्त्यावरुन फिरणे दिवसेंदिवस अवघड होत असताना आता आईबरोबर लिफ्टमधून जाणार्‍या १६ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) एका 20 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार गंज पेठेतील (ganj peth) पीएमसी कॉलनीमध्ये (pmc colony) शुक्रवारी रात्री दहा वाजता घडला. याप्रकरणी एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. ही मुलगी पीएमसी कॉलनीमधील इमारतीतील लिफ्टमधून आईसमवेत तळमजल्यावरुन 6 व्या मजल्यावर जात होती. यावेळी लिफ्टमध्ये आलेल्या तरुणाने आईच्या देखत या मुलीचे केस ओढून तिच्या शरीरावर हात फिरवून जवळ ओढून विनयभंग केला. खडक पोलिसांनी (Khadak Police) या तरुणाला अटक केली आहे.

हे देखील वाचा

Pimpri Restaurant and Bar | पिंपरीतील रहाटणी येथील ‘स्पॉट-18’ आणि ‘योलो’ बार अँड रेस्टोवर पोलिसांचा छापा, 218 जणांवर कारवाई

Pune Crime | जेवणाच्या थाळीवरील ऑफर पडली दीड लाखाला; शहरातील नामांकित डायनिंग हॉलचे बनावट नंबर Google वर

Pradhan Mantri Mudra Yojana | PNB देतंय 50 हजार ते 10 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसे आणि कोण घेऊ शकतो लाभ; जाणून घ्या


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Man arrested for molesting minor girl in elevator

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update