Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयातून पुण्यात पुजाऱ्यानेच केला मित्राचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नात्यातील महिलेसोबत अनैतिक संबंध (Immoral Relations) असल्याच्या संशयावरुन पुजारी असलेल्या मित्रानेच मित्राचा खून (Murder) केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. खूनाच्या घटनेनंतर अवघ्या 48 तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल करुन आरोपीला अटक (Arrest) केली आहे. संभाजी बबन गायकवाड Sambhaji Baban Gaikwad (वय – 44) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पिंटू उर्फ रामदास तुकाराम पवार Pintu alias Ramdas Tukaram Pawar (वय – 40) याला अटक (Pune Crime) केली आहे.
नारायणगाव पोलीस ठाण्याचे (Narayangaon Police Station) सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड आणि पवार हे मित्र आहेत. पवार मीना नदीच्या (Meena River) काठावर असलेल्या एका मंदिरात पुजारी होता. गायकवाड पवार याच्याकडे नेहमी यायचा. गायकवाडचे आपल्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पवारला होता. त्यानंतर पवारने तीक्ष्ण हत्याराने वार करुन गायकवाड याचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला. (Pune Crime)
—
आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले. पथकातील पोलीस आरोपीचा शोध घेत असताना आरोपी पवार वरसावने गावाजवळ डोंगररांगात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर आरोपी पवार तेथून पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. त्यानंतर तो घोडेगाव (Ghodegaon) स्मशानभूमीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पवार याला सापळा रचून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Crime Branch Police Inspector Ashok Shelke), नारायगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे आणि तपास पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update