Pune Crime | धक्कादायक ! रक्षाबंधनासाठी पत्नीला माहेरी घेऊन गेलेल्या पतीचा प्रियकरानंच काढला काटा

पुणे / भिगवण : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | भिगवण (Bhigwan) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनासाठी आपल्या पत्नीला घेऊन माहेरी गेलेल्या एका युवकासोबत अजब घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे पत्नीच्या जुन्या प्रियकारानं संबंधित तरुणाचा निर्घृण खून (Murder) केला आहे. याबाबत माहित समजताच पोलिसांनी 24 तासात आरोपीचा छडा लावला (Pune Crime) आहे. मुख्य आरोपीसह त्याच्या चुलत भावाला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, कोर्टाने त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी (Police cell) सुनावली.

याबाबत अधिक माहिती, महेश दत्तात्रय चव्हाण (Mahesh Chavhan) असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे. महेश हे रक्षाबंधनानिमित्त आपल्या पत्नीला घेऊन सासरवाडीला अर्थात अकोले येथे आले होते.
परंतु, रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी (23 ऑगस्ट) रोजी महेश यांची भालदवाडी-अकोले (Bhaldwadi-Akole) गावच्या शेतात धारदार हत्याराने गळा चिरून हत्या (Murder) केली.
ही घटना उघडकीस येताच भिगवन पोलीस ठाण्यात (Bhigwan Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, ही हत्या नेमकी कोणी केली याबाबत माहिती अस्पष्ट होती.
मात्र, पोलिसांनी स्थानिक सूत्राच्या साहाय्याने तपास घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अशी घटना समोर आली –

मृत महेश यांच्या पत्नीचं माहेरी घराशेजारी राहणाऱ्या अनिकेत शिंदे नावाच्या तरुणा बरोबर प्रेमसंबंध (love affair) होते, याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
याद्वारे पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्यानं उडवा उडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली.
पण, पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी कबुल झाला.
दरम्यान, अनिकेतनं मृत महेश (Dead Mahesh) यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती दिली. तसेच महेशमुळे प्रेयसीला भेटता येत नव्हतं.

 

दरम्यान, त्यामुळे महेशबाबत अनिकेतच्या मनात प्रचंड राग होता. दरम्यान महेश सासरवाडीला येणार असल्याची माहिती मिळाली.
या आलेल्या संधीचा फायदा घेत आरोपीने आपला चुलत भाऊ गणेश शिंदे (Ganesh Shinde) याच्या मदतीनं महेशचं जीवन संपवलं.
पोलिसांनी (Police) दोघांनाही अटक (Arrested) केली आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : pune crime | man killed girlfriends husband on rakshabandhan in bhigwan pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Jeevan Shanti Yojana | एलआयसीची ‘ही’ पॉलिसी आयुष्यभर करून देईल कमाई, जाणून घ्या कशाप्रकारे मिळतील फायदे

Pune Crime | शेतात गाय बांधल्‍यावरून सख्ख्या चुलत भावात तुंबळ मारामारी; आईचा मृत्‍यू

Jalgaon Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा निर्घृण खून