Pune Crime | पिंपरीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या 37 वर्षीय महिलेचे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तब्बल तीन वर्षांपासून 37 वर्षीय ब्युटी पार्लर (Beauty Parlor) चालवणाऱ्या महिलेचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. तसेच आरोपीनं पीडित महिलेकडून रोख रकमेसह ऑनलाइन पद्धतीने पैसे घेत, तिची फसवणूक (Cheating) केली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

दीपक आत्‍माराम शेंडगे Deepak Atmaram Shendge (रा. भोसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेनं सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता हि घटस्फोटित (Divorce) असून तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. मॅट्रीमोनिअल साईटवर (Matrimonial Site) पीडितेने दुसरं लग्न करण्यासाठी नाव नोंदणी केली होती. त्या वेब साईटवरून पीडितेची दीपक शेंडगेशी ओळख झाली होती. त्यानंतर शेंडगेने पीडितेचा विश्वास संपादन करून वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. (Pune Crime)

तसेच वेगवेगळी कारणं देत आरोपीनं पीडित महिलेकडून एक लाख 90 हजार रुपये रोख आणि 1 लाख 70 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. त्याचबरोबर तीन लाख रुपयांचे दागिने (Jewelry) सुद्धा परस्पर घेतले आहेत. त्यानंतर पीडितेने पैसे आणि दागिने आरोपीकडे मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केली. तसेच तुझे अश्लील फोटो (Pornographic Photos) माझ्याकडे आहेत. हे फोटो कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत ब्लॅकमेल (Blackmail) केलं. आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी बलात्कारासह, ब्लॅकमेल आणि आर्थिक फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | man raped and cheated woman who run beauty parlour in pimpri chinchwad area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा