Pune Crime | धक्कादायक! मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील बारामती येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाला (Child) जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊ एका महिलेला काटेरी झुडपात ओढत नेत तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) घडली आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) रोहित केशव जगताप Rohit Keshav Jagtap (वय-28 रा. कसबा, बारामती) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि.6) दुपारी बाराच्या सुमारास घडली. आरोपीने पीडीतेला तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत मोरगाव रस्ता सिकंदरनगर (Sikandarnagar Morgaon Road) येथील झुडपात ओढत नेले. त्याठिकाणी महिलेसोबत अश्लील बोलून तिच्यावर अत्याचार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडित महिला ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी गोंधळ घालून सोबत चल अशी परत मागणी केली. तिने नकार दिला असता तिच्या घरी जाऊन तिच्या दरवाज्याची तोडफोड (Vandalism) केली. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून आरोपीला तात्काळ अटक केली आहे.(Pune Crime)

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub-Divisional Police Officer Ganesh Ingle)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक (Police Inspector Sunil Mahadik),
पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील (PSI Ganesh Patil), युवराज घोडके (PSI Yuvraj Ghodke)
तसेच पोलीस हवालदार शिंदे, इंगळे करीत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक महाडिक यांनी दिली.

 

Web Title :- Pune Crime | man rapes woman after threatening to kill her child baramati of pune crime news

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ahmednagar ACB Trap | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Police Suspended | 6 पोलिसांचं तडकाफडकी निलंबन ! 40 लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त

 

Katraj Kondhwa Flyover | नितिन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होउन 9 महिने झाले, परंतू कात्रज येथील वंडरसिटी ते राजस सोसायटी दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवातच नाही