Pune Crime | धक्कादायक ! पिंपरी-चिंचवड परिसरात मॅनेजर महिलेवर ‘जीप’ मध्ये बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील एक धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. प्रसिद्ध ई-काॅमर्स कंपनीत मॅनेजर असलेल्या उच्चशिक्षित 30 वर्षीय महिलेवर एका ‘जीप’मध्ये बलात्कार (Rape in Pune) करण्यात आल्याची घटना घडली. संबधित आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत 8 लाख रुपये उकळून पीडित महिलेची फसवणूक केली. तसेच लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार रहाटणी व वाकड येथे 23 जुलै ते 7 ऑक्टोबर 2021 या कालाधीत घडला. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली.

याबाबत माहिती अशी, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन आश्विक शुक्ला (Ashwik Shukla) (रा. बालेवाडी, पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पीडित महिला उच्चशिक्षित असून प्रसिद्ध ई-काॅमर्स कंपनीत मॅनेजर आहे. जीवनसाथी डाॅट काॅम या वेबसाईटवरून फिर्यादीची आणि आरोपीची ओळख झाली. सेन्ट्रल मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीकल्चर ॲण्ड फार्मर वेल्फेअर येथे डायरेक्टर म्हणून नोकरीला आहे, असं आरोपीने सांगितले. तर, लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास जुळवला. (Pune Crime)

 

त्यानंतर कस्टममधून आलेल्या वस्तू कमी दरात घेऊन त्यांची विक्री करण्याचा माझ्याकडे 1 बिझनेस प्लॅन आहे.
असं त्यानं सांगितलं. त्यासाठी 40 लाखाची गरज आहे. 30 लाख रुपये आहेत. 10 लाखाची गरज आहे.
असं आरोपीने पिडित महिलेला सांगितलं. या मागणीवरुन महिलेने आरोपीला 8 लाख रुपये दिले.
त्यानंतर, आरोपीने रहाटणी तसेच वाकड येथे फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
वाकड येथील एका हाॅटेलच्या पाठीमागे एका जीपमध्येही अत्याचार केला.
पीडित महिलेने आरोपीला दिलेले 8 लाख रुपये परत मागितले असता आरोपीने पैसे देण्यास नकार दिला.
असे फिर्यादीत नमूद करण्यात आलेय. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास वाकड पोलिस (Wakad Police Station) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | manager woman raped in jeep molestaion pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा