Pune Crime | पालखीचे दर्शन घेत असताना तीन महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुणे शहरात आगमन होत असताना दर्शनासाठी झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी (Thieves) तिघा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले (Chain Snatching In Pune). ही घटना येरवडा (Yerwada) येथील इंदिरानगरमधील दत्त मंदिरासमोर बुधवारी (दि.22) दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या (Pune Crime) सुमारास घडली.

याप्रकरणी वाघोली (Wagholi) येथे राहणार्‍या एका 27 वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी फिर्यादी इतर दोन महिलांसह इंदिरानगर येथील दत्त मंदिरासमोर थांबल्या होत्या.
माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेत असताना अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील 3 तोळे वजनाचे 90 हजार रुपयांचे मंगळसुत्र चोरून (Stealing Mangalsutra) नेले. तसेच दुसर्‍या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे 75 हजार रुपयांचे मंगळसुत्र तसेच आणखी एका महिलेच्या गळ्यातील 15 हजार रुपयांची सोन्याची चैन (Gold Chain) असे एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचे दागिने (Jewelry) हिसकामारून चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक मगदुम (PSI Magdum) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Mangalsutra of three women was snatched while visiting the palanquin Chain Snatching In Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; ‘हे’ आहे कारण…

 

Ration Card Portability Scheme | गरिबांसाठी संपूर्ण देशात ‘ही’ योजना लागू, शेवटी सहभागी झाले ‘हे’ राज्य

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात का निघालेत हे लवकरच समजेल’ – संजय राऊत