Pune Crime | 2 डॉक्टरांना धमकावून 30 लाखाची खंडणी घेताना मंगेश कांचनला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीतील दोन डॉक्टरांना (Doctor) धमकावून (Threat) तीस लाख रुपयांची खंडणी (Ransom) उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Pune Criminals) पोलिसांनी (Pune Police) सापळा रचून अटक (Arrest) केली. मंगेश माणिक कांचन Mangesh Manik Kanchan (वय – 35 रा. पाढरस्थळ, उरुळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या राहत्या घरात खंडणी घेताना रंगेहाथ (Pune Crime) पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.12) उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथे करण्यात आली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदार व त्यांचे डॉक्टर मित्र हे मिळून गर्भलिंग निदान (Pregnancy Diagnosis) व गर्भपात (Abortion) करतात असे खोटे साक्षीदार उभे करुन त्याबाबत माझ्याकडे व्हिडीओ क्लिप (Video Clip) असून ती मी पोलिसांकडे देऊन तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी (Pune Crime) दिली. तसेच त्यांच्याकडे 30 लाख रुपयाची खंडणी मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच फिर्यादी यांना आरोपी व त्याच्या साथिदाराने बंदुकीचा (Gun) धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन खंडणीची रक्कम घेऊन घरी बोलावले असल्याचे पोलिसांना सांगितले.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सापळा कारवाईचे नियोजन करुन सापळा रचला. तक्रारदार हे आरोपीच्या राहत्या घरी जाऊन खंडणीची रक्कम देताच पोलिसांनी आरोपी मंगेश कांचन याला रंगेहात पकडले. आरोपीकडून खंडणीची रक्कम जप्त करुन त्याला अटक केली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी यवत (Yavat Police Station), दौड (Daud Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station), ओतूर (Otur Police Station), विमानतळ (Vimantal Police Station), हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) खुन (Murder), खंडणी, दरोड्याचा प्रयत्न (Attempted Robbery), जबरी चोरी, अपहरण (Kidnapping), बलात्कार (Rape) असे 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale), पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore),
किरण धायगुडे (PSI Kiran Dhayagude), पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनिल शिंदे, नरेंद्र सोनवणे, पोलीस नाईक श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, पोलीस शिपाई गणेश भापकर, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Mangesh Kanchan arrested by Loni Kalbhor police for threatening two doctors and demanding Rs 30 lakh ransom

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा