Pune Crime | मराठे ज्वलर्स फसवणूक प्रकरण : मंजिरी मराठेसह कौस्तुभ मराठेंना अटक

पुणे : Pune Crime | विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या रोख रक्कम, सोने चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेल्या ठेवीची रक्कम तसेच त्यावरील परतावा न देता गुंतवणूकदरांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वलर्सच्या कौस्तुभ अरविंद मराठे (kaustubh arvind marathe) आणि मंजिरी कौस्तुभ मराठे यांना पोलिसांनी अटक (Pune Crime) केली.

दोघेही सोमवारी (13 सप्टेंबर) विशेष सत्र न्यायालयात  हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी प्रणव मिलिंद मराठे pranav milind marathe (वय 26, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे ) याला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे (milind arvind marathe), नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे (वय 59, रा. कोथरूड ) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणव मराठे ज्वेलर्सच्या लक्ष्मी रोड (Laxmi Road) तसेच पौड रोड (Paud Road) येथील शाखांमध्ये 14 जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.

Shocking ! 10 व्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली जुळी मुले, Live Streaming मध्ये रमलेल्या आईला ओरडण्याचा आवाजही आला नाही

आरोपींनी प्रणव ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने,चांदी आदी गुंतवणूक करायला लावली तसेच  फिर्यादींसह एकुण 18 गुंतवणूकदारांची  5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रूपयांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले आहे. याप्रकरणात 21 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

आरोपी तपासात सहकार्यही करीत नाहीत. मंजिरी मराठे (manjiri kaustubh marathe)
यांच्या बँक खात्यावर साक्षीदाराने गुंतवणूक केलेली रक्कम पाठविण्यात आली आहे. तसेच मंजिरी मराठे या 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत मराठे ज्वेलर्स संस्थेत भागीदार म्हणून सहभागी होत्या.  आरोपींनी गुंतवणूकीपोटी साक्षीदार व इतरांना त्यांच्या पोचपावत्या दिल्या तसेच गुंतवणूकदारांचा डाटा नक्की कोणत्या संगणकामध्ये आहे याबाबत तपास करणे. गुंतवणूकदार यांचेकडून ठेवी स्विकारल्याबाबत ठेवीदारांना स्वत:च्या हस्ताक्षरात  ठेव पावती दिलेली आहे. त्या पावतीवरील हस्ताक्षराबाबत आरोपींच्या हस्तक्षराचे नमुने घेवून हस्ताक्षर पुरावा प्राप्त करायचा आहे.

आरोपीस जामीन मिळाल्यास ते देशाबाहेर जाण्याची तसेच साक्षीदारांना धमकाविण्याची शक्यता आहे.  मराठे ज्वेलर्स  प्रा लि. कंपनीने ( (marathe jewellers pvt ltd company)
आरोपी संचालकाने कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार प्राप्त असून त्याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे.
त्यामुळे आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एम.बी. वाडेकर (m.b. Wadekar) यांनी केली.
न्यायालयाने त्यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा

Ration Card | रेशन कार्डमध्ये अपडेट करा स्वतःचा मोबाइल नंबर, नेहमी मिळेल ‘लाभ’; जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,685 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Marathe Jewelers fraud case: Kaustubh Marathe arrested along with Manjiri Marathe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update