Pune Crime | डी फार्मसी केले नसताना खोटे सांगून केले लग्न; आता मेडिकल दुकान विकत घेण्यासाठी केला जात आहे विवाहितेचा छळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोरोना काळापासून मेडिकल दुकानांना (Medical Store) चांगलाच भाव आला आहे. त्यामुळे एका तरुणाने आपण डी फार्मसी (D Pharmacy) केले असल्याचे खोटे सांगून मेडिकल दुकान असल्याचे भासवून लग्न केले. आता मेडिकल दुकान विकत घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, म्हणून विवाहितेचा छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका २७ वर्षाच्या महिलेने वारजे पोलिसांकडे (Waraje Police) फिर्याद (गु. रजि. नं. ३१२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चर्‍होली फाटा (Charholi Phata) येथे राहणार्‍या पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ८ जानेवारी २०२२ ते २८ जुलै २०२२ दरम्यान भोसरी, चर्‍होली फाटा आणि बारामतीमधील (Baramati News) वाघळवाडी येथे घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयुर याने आपण डी फार्मसी झाले असून आपले स्वत:चे मेडिकलचे दुकान असल्याचे फिर्यादी व त्यांच्या आई वडिलांना खोटे सांगितले.
त्यामुळे तिच्या आई – वडिलांनी फिर्यादीचे लग्न मयुर याच्याबरोबर करुन दिले.
लग्नानंतर मयुर याचे डी फार्मसी झाले नसून मेडिकलचे दुकानही नसल्याचे समजले.
त्यानंतर मयुर व त्यांच्या आई – वडिलांनी फिर्यादीस मेडिकल दुकान विकत घेण्यासाठी तिचे आई – वडिलांकडून पेसे आणावेत.
तसेच घरगुती किरकोळ कारणावरुन तिचा अपमान करणे, शिवीगाळ करुन मारहाण केली.
मयुर याने फिर्यादीसोबत जबरदस्तीने वेळोवेळी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.
शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव (Sub-Inspector of Police Jadhav) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | Marriage was done by telling lies when D did not do pharmacy Now it is being done to buy medical shop Harassment of the married

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा