Pune Crime | धक्कादायक ! सासरचा त्रासाला अन् मित्राच्या छळाला कंटाळून उच्च शिक्षीत विवाहितेची 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका 27 वर्षीय उच्च शिक्षीत विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. पती, सासू-सासरे आणि मित्राच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणीने 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याआधी तिने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मानसी भूपेंद्र यादव Mansi Bhupendra Yadav (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मित्र शिरीष नरेंद्र शहा (Shirish Narendra Shah) (वय 33, रा. मांजरी) याला अटक (Arrested) करण्यात आले आहे. पती भूपेंद्र मुलायमसिंग यादव (Bhupendra Mulayam Singh Yadav) (वय 30), सासरे मुलायम सिंग यादव (Mulayam Singh Yadav) (वय 52) आणि सासू राजकुमारी मुलायमसिंग यादव (Rajkiumari Mulayam Singh Yadav) (वय 50) यांच्यावर चंदनगर पोलीस ठाण्यात (Chandnagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मानसी यादव हिचे भूपेंद्र यादव यांच्याशी विवाह झाला होता. पती, सासू सासरे हे सर्व मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) राहतात. तर मानसी यादव ही उच्च शिक्षणासाठी खराडी (Kharadi) येथील ईनयांग सोसायटीत राहत होती. तिची रियल इस्टेट एजंट (Real Estate Agents Pune) असलेल्या शिरीष शहा याच्यासोबत ओळख झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पती आणि सासू सासरे तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करत होते. शिरीषही ती विवाहित असल्‍याचे माहित असून विवाहासाठी तिच्याशी वारंवार वाद घालत होता. त्याचबरोबर मानसीकडे पैशाचीही मागणी करत होता. (Pune Crime)

 

 

दरम्यान, त्यांच्या त्रासाला मानसीने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण, तिला नागरिकांनी वाचविले. आणि घरी आणून सोडले होते. त्यानंतर तिने 10 व्या मजल्यावरून उडीमारून आत्महत्या (Suicide) केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे (API Manohar Sonawane) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | married woman commits suicide after being harassed by her father in law

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा