Pune Crime | सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; येरवडा परिसरातील घटना, पती स्वप्निल बाफनाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सासरच्या व्यक्तींकडून सातत्याने होणार्‍या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना येरवडा (Yerwada) भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक (Pune Crime) केली आहे.

स्वप्निल रमेशचंद्र बाफना Swapnil Rameshchandra Bafna (३४ रा. रामवाडी गावठाण, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत महिलेचे वडील संजय संचेती (५८, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. मे २०१३ मध्ये फिर्यादी यांची मुलगी रेणू हिचे स्वप्निल बाफना याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून ते रामवाडी गावठाण परिसरात एकत्र राहत होते. परंतु मागील काही दिवसांपासून महिलेची सासू- सासरे तिला मानसिक त्रास देत होते. माहेरी निघून जा असे सांगत सासूने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. सततच्या जाचाला कंटाळून तिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे (Woman Police Sub Inspector Mohini Dongre) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Married woman commits suicide due to in-laws’ harassment; Incident in Yerawada area, husband Swapnil Bafna arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhar Card Verify | फसवणूक टाळण्यासाठी ड्रायव्हर, नोकर, भाडेकरूचं आधार कार्ड Verify कसं कराल? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 161 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai Pune Deccan Queen | मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच, 8 ऑगस्टपासून बुकिंग सुरु