Pune Crime | अभ्यासासाठी मुलाला का मारते? पती रागावल्याने पत्नीने उचलले टोकाचं पाऊल

भिगवण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुलाचा अभ्यास घेत असताना पती रागावल्याच्या कारणावरुन विवाहितेने गळफास (Hanging) लावून आत्महत्या केल्याचा (Committed Suicide) धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) भिगवण (Bhigwan) येथे घडला आहे. रोहिणी राकेश थोरात Rohini Rakesh Thorat (वय-25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत राकेश थोरात यांनी भिगवण पोलीस ठाण्यात (Bhigwan police station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी राकेश थोरात कामावरुन घरी आले असता पत्नी रोहिणी मुलाचा अभ्यास (Study) घेत होत्या. तर मुलगा राघव हा अभ्यास करत नसल्यामुळे रोहिणी त्याला हाताने मारहाण (Beating) करत होती. त्यावेळी राकेशने तु अभ्यासाठी मुलाला का मारते त्याचा अभ्यास तो करेल, असे म्हणत तिच्या हातातून मुलाला सोडवून आपल्या जवळ घेतले. (Pune Crime)

 

पती रागावल्याने रोहिणी हिने आता याचा अभ्यास तुम्हीच घ्या असे म्हणत रागाने घरात जाऊन दरवाजा बंद केला. बराच वेळ झाला तरी रोहिणी दार उघडत नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रोहिणी हिने घराच्या छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. राकेशने शेजाऱ्यांच्या मदतीने रोहिणीला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासून रोहिणीला मृत घोषीत केले. पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | married woman suicide in bhigwan because her husband was angry for that reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Torna Fort News | दुर्दैवी ! तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

 

Pension Seva SBI | Pension खात्यात येत राहावी यासाठी SBI ने आणली विशेष सेवा, जाणून घेणे आवश्यक

 

JSY Scheme | विवाहित महिलांसाठी खुशखबर ! मोदी सरकार खात्यात ट्रान्सफर करेल 3600 रुपये, तात्काळ करा अर्ज