Pune Crime | पुण्यातील उच्चशिक्षित तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ क्लिप केली व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हॉटेलमध्ये गेल्यानंतर मैत्रिणीला गुगल पे वरून पैसे पाठवण्याच्या बहाण्याने तरुणाने एका पुण्यातील (Pune Crime) एका उच्चशिक्षीत तरुणीसोबत ओळख केली. हीच ओळख तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला ब्लॅकमेल (Blackmail) करत तरुणाने व त्याच्या मित्राने सामूहिक अत्याचार (mass sexual assault) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. या गुन्ह्यातील गंभीर बाब म्हणजे तरुणांनी अत्याचार करतानाचे चित्रिकरण करुन ते आपल्या गावाकडच्या मित्राला पाठवले. त्याने हे चित्रिकरण सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) करुन तरुणीची बदनामी केली.

याप्रकरणी पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जलदगतीने तपास करुन तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
विकी उर्फ विकास विनायक राठोड Vicky alias Vikas Vinayak Rathod (वय-21 रा. शिवांश हाईट्स, शिंदेनगर, मारुंजी गाव, मुळ रा. ता. पैठण जि. औरंगाबाद),
निखील प्रताप पाटील Nikhil Pratap Patil (वय-31 रा. मातोश्री बिल्डींग, शिंदेनगर, मारुंजी गाव,पुणे मुळ रा. मु.पो. खरोसा, ता. औसा, जि. लातूर)
अमर गोरखनाथ राठोड Amar Gorakhnath Rathod (वय -23 रा. मु.पो. थापटी, तांडा, ता. पैठण जि. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी उच्चशिक्षीत असून ती पुण्यातील (Pune Crime) एका खासगी वसतीगृहात राहते.
रविवारी मेस बंद असल्याने ती आणि तिची मैत्रीण जंगली महाराज रोडवरील (Jangli Maharaj Road) हॉटेलमध्ये गेले होते.
त्यावेळी मैत्रिणीला पाचशे रुपये पाठवायचे होते मात्र, तिच्याकडे पैसे ऑनलाइन पाठवण्याची सुविधा नव्हती.
त्यामुळे तिने त्याठिकाणी उपस्थित असलेला आरोपी विकी राठोडला पैसे पाठवण्यास सांगितले.
मात्र त्याच्याकडूनही पैसे ट्रान्सफर झाले नाहीत. परंतु त्या दोघांची मैत्री झाली.

मैत्री झाल्यानंतर दोघांनी आपले फोन नंबर एकमेकांना शेअर केले. आरोपी विकी आणि निखील हे पुण्यात नोकरीच्या (Job in Pune) शोधात होते.
त्यांनी पीडित तरुणीसोबत जवळीक वाढवत तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. यानंतर या घटनेचे चित्रिकरण गावाकडील मित्र अमर याला पाठवले.
त्याने अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

 

आरोपींकडून वारंवार ब्लॅकमेल करत असल्याने पीडित तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठले.
त्याठिकाणी असलेल्या महिला अधिकाऱ्यांना तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली.
शिवजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिच्याकडून आरोपींची सर्व माहिती घेतली.
त्यानंतर दोन पथके तयार करुन आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड (Police Inspector Vikram Goud) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने
(API Uttam Mane), पोलीस उपनिरीक्षक अरविंद म्हस्के (PSI Arvind Mhaske), तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर (PSI Atul Kshirsagar),
पोलीस अंमलदार राहुल होळकर, अनिकेत भिंगारे, तुकाराम मस्के, शरद राऊत महिला अंमलदार मंगला काटे यांच्या पथकाने केली

 

Web Title : Pune Crime | mass sexual assault on a highly educated girl in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अवघ्या 21 हजारात 1 वर्षाच्या गॅरंटीसह खरेदी करा Honda Activa, पसंत न आल्यास कंपनी परत देईल पूर्ण पैसे

Mahapour Chashak | महापौर चषक स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट, स्पर्धेेच्या मान्यतेस वित्तीय समितीचा नकार

Diabetes control | अंड्यामुळे आणखी वाढेल डायबिटीज! ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी सेवन करा ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या