Pune Crime | कुख्यात गुंड गोविंदसिंग टाक टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई, आतापर्यंत 55 गँगवर MCOCA अ‍ॅक्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime |पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उचलला आहे. पुण्यातील (Pune Crime) स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुंड गोविंदसिंग टाक (Govindsingh Tak) टोळीच्या म्होरक्यासह 6 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 55 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय-22 रा. हायस प्लॉट झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे), राहुल उर्फ लाल्ल्या संजय कांबळे (वय-20 रा. मंगळवार पेठे, पुणे), गणेश साहेबराव तुपे (वय-31 रा. मंगळवार पेठ, जुना भराव वस्ती, पुणे), ओंकार राजेंद्र भुजबळ (वय-22 रा. गणेश पेठ, पुणे), सुनिल विजय चव्हाण (वय-27 रा. गणेश पेठ, पुणे), सौरभ उर्फ साहील शिवशरण कांबळे (वय-19 रा. गुलटेकडी, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

आरोपींनी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत: दादा, भाई समजून समाजात दहशत निर्माण केली.
आरोपी गोविंदसिंग टाक याने आपल्या साथिदारांच्य मदतीने परिसरात खुनाचा प्रयत्न,
घातक शस्त्रांसह दरोडा, खंडणी, मारामारी, घातक शस्त्रे बाळगणे अशी गंभीर गुन्हे केले.
आरोपी टाक याने गंभीर गुन्हे केल्याने 2019 मध्ये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.
या कारवाईतून सुटल्यानंतर आरोपीने आपल्या साथिदारांना एकत्र करुन खुनाचा प्रयत्न व दुखापतीचे गुन्हे करुन दहशत पसरवून हप्ते वसुली केली होती.
या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्याचे (Swargate Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर (Senior Police Inspector Balasaheb Kopner) यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्यामार्फत तो अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Additional Commissioner of Police Rajendra Dahale) यांच्याकडे सादर केला.
राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजूरी दिली.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) करीत आहेत.

 

आतापर्यंत 55 टोळ्यांवर मोक्का

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 55 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील,
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव (Inspector of Police Somnath Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले
(PSI Ashok Yeole), सहायक पोलीस फौजदार प्रमोद खळमकर, पोलीस नाईक विजय कुंभार,
वैभव मोरे, विजय खोमणे, ज्ञानेश्वर बढे, मनोज भोकरे, लखन ढावरे, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे,
फिरोज शेख, शैलेश वाबळे, दिपक खेंदाड, सचिन दळवी, ऋषीकेश टिटमे, गोडसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | MCOCA action against 55 gangs so far

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | पीएफ खातेधारकांना फ्री मिळते ‘ही’ 7 लाख रुपयांची सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा करावा क्लेम ?

Sachin Vaze | सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा, आरोपपत्रात खुलासा

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही करू नये ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष; मोठ्या समस्येचा आहे संकेत, जाणून घ्या