Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडसह कुटुंबाविरोधात ‘मोक्का’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – औंध (Aundh) येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व जायवायसह 8 जणांविरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police – Crime Branch) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (maharashtra control of organised crime act) कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) यापुर्वीच गायकवाड कुटुंबावर मोक्कांतर्गत (MCOCA Action) Mcoca कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ आता पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनीही त्यांच्याविरोधात मोक्काचा बडगा उगारला आहे. कौटुंबिक छळासह खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे (Pune Crime) त्यांच्यावर दाखल आहेत.

नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड उर्फ भाऊ, गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा. एनएसजी हाऊस औंध, पुणे) सोनाली दिपक गवारे (वय-40), दिपक निवृत्ती गवारे (वय-54 दोघे रा. 1204/16, गजानन महाराज मंदीर, संभाजी बागेजवळ, शिवाजीनगर, पुणे), राजु दादा अंकुश उर्फ राजाभाऊ (रा. सर्वोदय रेसिडेन्सी, ए विंग, विशाल नगर, पिंपळे निलख मुळ रा. मुपो भोकर, ता. श्रीरामपूर), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघे रा. विधाते वस्ती, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल आहे.

आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे देऊन, पैशांच्या वसुलीसाठी गोळीबार करीत, जबरदस्तीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. व्याजाच्या पैशातुन लोकांच्या जागा, वाहने बळकावून बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा व साथीदारांनी मागील काही वर्षात खुनाचा प्रयत्न, खंडणी, जीवे मारण्याची धमकी, दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, कट रचून फसविणे, अवैध खासगी सावकारी केल्याबद्दलचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

Sleeping Tips | खुप वेळ सोफ्यावर झोपणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, कसे ‘ते’ जाणून घ्या…

नानासाहेब गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व साथीदारांची संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन विविध गुन्हे केले आहेत. प्रतिष्ठित व महत्वाच्या व्यक्तींशी संबंध निर्माण करुन गरजू व्यक्तींना बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत, त्यांच्याकडून मुद्दल, व्याजासह पैसे घेण्याबरोबरच त्यांच्या मालमत्ता बळावून बेहिशोबी मालमत्ता जमा केली.

आरोपींविरोधात मोक्कांतर्गत कारवाई व्हावी यासाठीचा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (DCP Pankaj Deshmukh) यांनी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे पाठविला होता. त्यास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव चव्हाण यांनी मंजुरी दिली. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) करीत आहेत.

आतापर्यंत 48 टोळ्यांवर मोक्का

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध
गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत
कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 48 गुन्हेगारी टोळ्यांवर
मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Pune Jt. CP
Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस
उपायुक्त परिमंडळ चार पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग
विभाग बजरंग देसाई, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण (API
Sameer Chavan), महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya
Pandharkar) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे देखील वाचा

Honey Trap Racket Pune | हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला लुटणारी टोळी अटकेत, कोंढवा पोलिसांकडून तरूणीसह 6 जणांना अटक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Raviraj Taware Firing case | रविराज तावरे गोळीबार प्रकरणात पुन्हा माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरेंना अटक होणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | ‘Mcoca’ action against businessman Nanasaheb Gaikwad and his family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update