Pune Crime | कुख्यात गुंड आक्रम शेख टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून ‘मोक्का’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उगारला आहे. पुण्यातील (Pune Crime) स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate police station) हद्दीत स्वत:ला भाई, दादा समजून दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुंड आक्रम शेख टोळीच्या (Akram Sheikh Gang) म्होरक्यासह 6 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 58 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

टोळी प्रमुख आक्रम आजिज शेख (रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), टोळीतील सदस्य अमित मल्लीकार्जून शेकापूरे (वय-20 रा. समाज मंदिराजवळ, गुलटेकडी), अन्वर उर्फ जंब्या शाकीर शेख (वय-19 रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), ओमकार दयानंद पवार (वय-19 रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी), इमाम शब्बीर शेख (वय-18 रा.औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), शारुख अजिज शेख (वय-24 रा औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे.

 

आक्रम शेख आणि त्याच्या साथिदारांनी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, खंडणी, हप्ता गोळा करणे, खुनाचा प्रयत्न, मारामारी, घातक शस्त्र बाळगणे, अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व परिसरात दहशत पसरवण्यासाठी अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे टोळी प्रमुख आजिज शेख याला 2013 मध्ये दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.

 

 

तडीपारीच्या कारवाईतून सुटल्यानंतर आरोपीने आपल्या साथिदारांच्या मदतीने दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी परिसरातील एका व्यावसाईकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले (PSI Tushar Bhosle) यांनी आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त (Pune Crime) केली.

 

गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर (Senior Police Inspector Balasaheb Kopner) यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे (Addi CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग चंद्रकांत सांगळे (ACP Chandrakant Sangale) करीत आहेत.

 

आयुक्तांची 58 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या
गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 58 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील,
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर,
पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, अशोक येवले, सहायक पोलीस फौजदार प्रमोद कळमकर,
पोलीस नाईक विजय कुंभार, वैभव मोरे, ज्ञानेश्वर बढे, मनोज भोकरे, गोडसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | ‘Mcoca’ action by Commissioner of Police Amitabh Gupta on notorious goon Akram Sheikh gang

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा