Pune Crime | पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरातील सराईत गुन्हेगारासह तिघांवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 109 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जेवण न दिल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि कामगारांवर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी वारजे माळवाडी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मंगेश जडीतकर आणि त्याचा दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात (Pune Crime) आरोपी जडीतकर आणि त्याच्या इतर दोन साथिदारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मोक्का कलमाचा अंतर्भाव केला आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 109 आणि चालु वर्षात 46 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख मंगेश विजय जडीतकर (वय-23 रा. दांगट पाटीलनगर, शिवणे पुणे), सौरभ प्रकाश मोकर (वय-22 रा. मुक्ताई हाईट्स, उत्तमनगर, पुणे), शुभम अनिल सुद्देवार (वय-25 रा. पारगे बिल्डींग, चैतन्य चौक, वारजे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime)

मंगेश जडीतकर आणि त्याच्या साथिदारांनी वारजे परिसरात खून, जिवे मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नसून त्यांनी पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 सुहेल शर्मा यांच्यामार्फत
अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेंद्र डहाळे यांना सादर केला होता. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी
मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके,
पोलीस निरीक्षक गुन्हे दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार सचिन कुदळे,
अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका कोल्हे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | MCOCA against three criminals including an innkeeper in Pune’s Warje Malwadi area, Police Commissioner Amitabh Gupta’s 109th MCOCA action till date

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का?’; रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Uday Samant | ठाकरे गटाची चिंता वाढणार? उदय सामंतांचा मोठा दावा, म्हणाले – ‘गुवाहाटीवरून परत येताना आमच्यासोबत’

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील