Pune Crime | दहशत निर्माण करणार्‍या सचिन नवलेसह 9 जणांवर मोक्का ! पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांची आतापर्यंतची 84 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वानवडी परिसरात (Wanwadi) संघटित गुन्हेगारी (Organized Crime) करुन दहशत पसरविणार्‍या सचिन नवले (Sachin Navle) याच्यासह त्याच्या टोळीतील एकूण 9 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशाने मोक्का MCOCA (Mokka Action) कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

सचिन संजय नवले (वय 27, रा. संकेत विहार, सिद्धी विनायक कॉलनी, फुरसुंगी), कुमार ऊर्फ गोट्या बलभीम लोहार (वय 26, रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर), रोहन ऊर्फ भैय्या अनिल देडगे (वय 25, रा. रामटेकडी, हडपसर), आकाश दत्तात्रय कोठावळे (वय 25५, रा. काळेपडळ, हडपसर), राहुल हरी घडाई ऊर्फ कोळी (वय 23, राा. फुरसुंगी), आकाश उमेश कसबे (वय 19, रा. संकेत विहार कॉलनी, फुरसुंगी), ओमकार ईश्वर सुपेकर (वय 21, रा. गाडीतळ वेताळ बाबा वसाहत, हडपसर), मयुर राजू सकपाळ (वय 24, रा. काळे पडळ, हडपसर), शाम दत्तात्रय सरक (वय 20, रा. काळेपडळ, हडपसर) अशी मोक्का कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी कार्यभार घेतल्यानंतरची मोक्का अंतर्गत केलेली 84 वी कारवाई असून या वर्षातील 21 वी कारवाई आहे. (Pune Crime)

 

सनी ऊर्फ गिरीश हिवाळे व सचिन नवले या सराईत गुन्हेगारांमध्ये वाद होता. हिवाळे याच्यावर फेब्रुवारी 2021 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 9 एप्रिल 2022 रोजी सनी हिवाळे हा जामीनावर सुटून बाहेर आला होता. सनी व त्याचे मित्र सोहेल हे काळे पडळ येथील चौकात थांबले असताना सचिन नवले व त्याच्या साथीदारांनी सनी हिवाळे याच्यावर कोयता, पालघन, लाकडी दांडक्याने मारहाण करुन सनीचा खून केला होता. सोहेलही जखमी झाला होता.

वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) सचिन नवले व त्याच्या 15 ते 20 साथीदारांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यातील अनेकांना अटक केली आहे.
सचिन नवले हा स्वत:च्या टोळीचे परिसरात वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून वारंवार शरीराविरुद्धचे गुन्हे करीत असतो.
त्याने वानवडी, हडपसर व परिसरात कोयता, बांबु अशा घातक हत्यारांसह गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,
कट रचून खून करणे व गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत.
त्यामुळे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड (Senior Police Inspector Deepak Lagad)
यांनी उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अ
पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे पाठविला होता.
या प्रस्तावाची छाननी करुन नामदेव चव्हाण यांनी त्याला मंजूरी दिली.
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | MCOCA Mokka Action on 9 people including Sachin Navale who created terror! Police Commissioner Amitabh Gupta’s 84th action so far

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा