Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Crime | आपली दहशत निर्माण करण्यासाठी व बदला घेण्यासाठी गोळीबार (Firing) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) करणार्‍या निलेश गायकवाड (Nilesh Gaikwad Gang) याच्यासह त्याच्या टोळीतील 11 जणांवर मोक्का Mokka (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गेल्या सव्वा वर्षात केलेली ही 61 वी ‘मोक्का’ कारवाई (Pune Crime) आहे.

 

 

 

 

निलेश विजय गायकवाड (रा. रामनगर, वारजे), अक्षय रवींद्र खवळे, ऋतिक कैलास एखंडे (रा. म्हात्रे पुलाजवळ), विकी ऊर्फ हेमंत धर्मा काळे (रा. रामनगर, वारजे), मोन्या ऊर्फ रामेश्वर सुभाष मोरे, कार्तिक संजय इंगवले (वय १८), अनिरुद्ध ऊर्फ बाळा राजू जाधव (वय २४, रा. रावेत गाव), अरविंद मारुती माडकर (वय ३०, रा. रामनगर, वारजे), अक्षय ऊर्फ अवधुत महेश यादव (वय २७), संकेत राजेंद्र ढेणे (वय २३, रा. वारजे), विकास कैलास गव्हाड (वय २०, रा. सहयोगनगर, वारजे) अशी ‘मोक्का’ कारवाई झालेल्या गुंडांची नावे आहेत.

निलेश गायकवाड टोळीने (Nilesh Gaikwad Gang) वारजे, उत्तमनगर (Uttamnagar) परिसरातील आपल्या टोळीची दहशत निर्माण केली आहे. त्यांनी खुन (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder), शस्त्रे बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करुन दहशत निर्माण केली होती.

केदार भालशंकर हा मोटारीने जात असताना ८ ऑगस्ट रोजी शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोड (NDA Road, Pune) दरम्यान पाठलाग करुन निलेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन त्याला जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे (Uttamnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (Senior Police Inspector Sunil Jaitapurkar) यांनी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (Maharashtra Control of Organised Crime Act) MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन मोक्का कारवाईला मंजुरी दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही आतापर्यंतची 61 वी कारवाई आहे.

 

Web Title : Pune Crime | MCOCA on 11 persons including Nilesh Gaikwad from Warje Malwadi in pune ; 61st action of Police Commissioner Amitabh Gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन