Pune Crime | खंडणी न दिल्याने बिल्डरवर गोळीबार करणाऱ्या 4 जणांवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pune Crime | खंडणी (Ransom) न दिल्यावरून डुक्कर खिंड (Dukkar khind area) भागात बांधकाम व्यावसायिकावर (Builder) गोळीबार करणाऱ्या चौघांच्या टोळीवर मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. Pune Crime | Mcoca on four criminal by pune police

अभिजित ऊर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय 24, रा. कर्वेनगर) व उमेश श्रीराम चिकणे (वय 28,रा. कोथरूड) यांना अटक केली आहे. तर, नकुल शाम खाडे (मूळ रा. जुनी सांगवी, सध्या कोथरूड) व चेतन चंद्रकांत पवार (एसएनडीटीजवळ) हे दोघे अद्यापही फरार आहेत. या चौघांवर मोक्का कारवाई केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात ( Warje Malwadi Police Thane) गुन्हा (FIR) दाखल आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नकुल खाडे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो या टोळीचा प्रमुख आहे. त्याने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा मिळवा या उद्देशाने गुन्ह्यातील साथीदार आरोपी व अन्य सदस्यांना बरोबर घेवून संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन केलेली आहे. त्यांच्यावर आजवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यासह विविध गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान डुक्कर खिंडीजवळ दोन दुचाकीवरून येवून पिस्टलमधून पाच गोळीबार केला होता.
त्यापूर्वी एक महिना अगोदर टोळी प्रमुख नकुल खाडे यांनी फिर्यादी रवींद्र तागुंदे यांना पाच लाख रुपये खंडणी मागितली होती.
मात्र, तागुंदे यांनी खंडणी न दिल्याने खाडे याने साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर गोळीबार करून चांदणी चौकाचे दिशेने पळ काढला होता.

यापार्श्वभूमीवर वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके (Senior Inspector Shankar Khatke) यांनी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड  () यांच्याकडे मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्याची पडताळणी करून हा प्रस्ताव अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार मोक्काची कारवाई केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Web Title : Pune Crime | Mcoca on four criminal by pune police

हे देखील वाचा

Pune News | जामिनावर बाहेर अससेल्या 13000 कैद्यांसाठी खुशखबर ! ‘तो’ पर्यंत त्यांना परत जेलमध्ये बोलावले जाणार नाही

AADHAAR Updates | तुमच्या ‘आधार’सोबत होऊ शकते फसवणूक, रोखण्यासाठी आहेत ‘या’ टिप्स; जाणून घ्या

Gold Price Today | सोने तेजीनंतर सुद्धा मिळत आहे 10 हजार रुपये स्वस्त, चेक करा 10 ग्रॅम गोल्डचे नवीन दर