Pune Crime | कोंढव्यातील मंगेश माने टोळीवर ‘मोक्का’ ! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी MCOCA कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोंढवा परिसरात (Kondhwa) दहशत निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणार्‍या मंगेश माने (Mangesh Mane) व त्यांच्या टोळीतील इतर ५ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार Mokka (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही 62 वी मोक्का कारवाई आहे.

 

मंगेश अनिल माने (वय 26, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), लाडप्पा ऊर्फ अखिलेश ऊर्फ लाड्या चंद्रकांत कलशेट्टी (वय 20, रा. गोकुळनगर, कोंढवा बुद्रुक), सुरज अंकुश बोकडे (वय 22, रा. माऊलीनगर, कोंढवा), सागर कृष्णा जाधव (रा. सासवड व अप्पर बिबवेवाडी), प्रथमेश रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा), प्रतिक रमेश हनाळनंदे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

 

मंगेश माने (Mangesh Mane Gang) व त्यांच्या टोळीवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) शरीराविरुद्धचे 10 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहे. त्यांची कोंढवा, बिबवेवाडी (Bibvewadi Police Station), भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) परिसरात दहशत आहे. ते लोकांना दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder), जबर दुखापत करणे, प्राणघातक हत्यार विना परवाना जवळ बाळगणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे करीत असतात.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil)
यांनी सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) व पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil)
यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे पाठविला होता.
त्यांनी या प्रस्तावाची छाननी करुन त्याला मंजुरी दिली. प्रस्ताव तयार करण्यासाठी पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar),
पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत (Police Inspector Gokul Raut), सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील (API Swaraj Patil),
अनिल सुरवसे (API Anil Suravase), अंमलदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, रुपनवर यांनी सहाय्य केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | MCOCA on Mangesh Mane gang in Kondhwa ! 62nd MCOCA action by Police Commissioner Amitabh Gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन