पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करुन खंडणी (Extortion Case) मागणार्या कोंढवा (Kondhwa) पसिरातील आसेफ खान व त्याच्या 5 साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) अंतर्गत (MCOCA Action) Mokka पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई (Pune Crime) केली आहे़ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी चालू वर्षात 51 वी व एकूण 114 वी मोक्का कारवाई आहे.
टोळीप्रमुख आसेफ ऊर्फ आसिफ ईस्माईल खान (वय 23), इरफान हसन भोला (वय 25, रा. पर्वती, मुळ रा. विजापूर, कर्नाटक), शहाबाज मेहमुद खान (वय 50, रा. संतोषनगर, कात्रज), समीर मेहबुब शेख (वय 36, रा. संतोषनगर, कात्रज), फरियाज हसनखान पठाण (वय 32, रा. संतोषनगर, कात्रज) आणि जॉन अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)
आसेफ खान यांच्या टोळीवर खराडीतील आय टी पार्कमधील (Kharadi IT Park) कंपनीच्या मालकाला धमकावून खंडणी घेतल्याचा गुन्हा (FIR) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) दाखल आहे. खान हा त्याच्या सहा साथीदारांना वेळोवेळी बदलून बरोबर घेऊन चंदननगर, तसेच करमाड (Karmad Police Station), औरंगाबाद ग्रामीण (Aurangabad Rural Police Station) या पोलीस ठाण्यात त्यांच्यांविरुद्ध दरोडा (Robbery) व खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत.
स्वत: व टोळीचे सदस्यांना अवैध मार्गाने आर्थिक लाभ करुन गंभीर गुन्हे वारंवार संघटितपणे करीत आहे.
त्यामुळे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे
(Senior Police Inspector Rajendra Landge) यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borat) यांच्या मार्फत मोक्का प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण
(Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे सादर केला होता. चव्हाण यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव
(ACP Kishore Jadhav) अधिक तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जग्गनाथ जानकर
(Police Inspector Jagganath Jankar), सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे
(API Manohar Sonwane), उपनिरीक्षक अरविंद कुमरे (PSI Arvind Kumre),
पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, नाना पतुरे, सागर तारु, अनुप सांगळे यांनी केली आहे.
Web Title :- Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta’s 114th MCOCA action to date
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PM Narendra Modi | अरब देशातील कचराकुंडीवर चक्क PM मोदींचा फोटो
Pune Crime | पिस्तुलातून गोळी झाडून तरुणाचा बोपदेव घाटात खून