Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याकडून मेफेड्रोन (MD) जप्त, गुन्हे शाखेची खराडी परिसरात कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीकडून गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell, Pune) दोनने 35 ग्रॅम मेफेड्रोन Mephedrone (एमडी) जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) चंदन महेंद्र सासी (Chandan Mahendra Sasi) याच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) एम. डी. पी. एस. अ‍ॅक्ट (MDPS Act) कलम 8 (क), 22 (ब), 29 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस नाईक चेतन गायकवाड (Police Naik Chetan Gaikwad) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंचल महेंद्र सासी (वय – 27 रा. आकाशगंगा सोसायटी, पीएमसी बिल्डींग, औंध – Aundh) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.20) खराडी (Kharadi) येथील चौधरी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केली. (Pune Crime)

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी खराडी येथील चौधरी वस्ती येथे एक व्यक्ती मेफेड्रोन हा अंमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खराडी परिसरात आरोपीचा शोध घेत असताना पाशाणकर यांच्या बांधकाम साईट (Pashankar Construction Site) समोरील सार्वजनिक रोडवर एकजण दुचाकीवर (एमएच 12 एस जे 9594) संशयित रित्या बसलेला दिसला. पथकाने सापळा रचून चंचल सासी याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या पँटच्या खिशात एका प्लास्टीक पिशवी मध्ये 35 ग्रॅम मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी मेफेड्रोन जप्त करुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर (Police Inspector Prakash Khandekar),
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख, योगेश मांढरे, बास्टेवाड, महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Mephedrone (MD) seized from drug dealer Pune Police Crime Branch action in Kharadi area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा