Pune Crime | मेफेड्रॉन तस्करीच्या तयारीतील टोळीला अटक, 5 लाखांचे मेफेड्रॉन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेफेड्रॉन Mephedrone (एमडी) अंमली पदार्थाची तस्करी करण्याच्या प्रयत्नातील टोळीला अमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell) एकने अटक केली. त्यांच्याकडून 5 लाखांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात (Pune Crime) आले आहे.

 

तालीब शकील अन्सारा (वय 23 रा, घोरपडे वस्ती, लोणी काळभोर), आयान अल्ताफ बागवान (वय 19 रा, भाग्योदयनगर कोंढवा खुर्द), वसिम आसिम सय्यद (वय -19 रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथक एक खडक पोलिस ठाण्यांतर्गत (Khadak Police Station) पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी शंकरशेठ रस्त्यावर तिघेजण मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 लाखांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar), लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Mephedrone smuggling gang arrested, Mephedrone worth 5 lakh seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Pune | केवळ अर्ध्या तासात पुणे शहरात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना, एकाचा मृत्यू

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण मिळणे काळाची गरज – शोभा आर धारीवाल