Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (attempt to Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) बोपोडी (bopodi) परिसरात घडली आहे. ही घटना आयटी पार्क समोरील रस्त्यावर बोपोडी (भाऊ पाटील रोड) येथे मंगळवारी (दि.27) सकाळी सातच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलाने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki police station) फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गणेश उर्फ घुल्या राजू शेट्टी (वय-26 रा. बोपोडी) याच्यासह इतर तिघांवर 307, 323, 504, 506(2), 34 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार मुलामध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेट
खेळताना वाद झाले होते. यानंतर फिर्यादी अल्पवयीन मुलगा मंगळवारी (दि.27) सकाळी सातच्या
सुमारास भाऊ पाटील रस्त्यावरील आयटी पार्कसमोर (IT Park) हातगाडी जवळ थांबला होता.
त्यावेळी चौघे आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी मुलाला जीवे मारण्याच्या उद्देशाने
कोयत्याने वार केले. पुढील तपास खडकी पोलीस (Khadki Police) करीत आहेत.

हे देखील वाचा

IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Police Officer Transfer | मुंबईतील पोलिस उपायुक्त पठाण व मणेरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील व शिंदे आणि मपोनि आशा कोरके यांची बदली

Covishield | ‘सीरम’ची कोविशील्ड लस घेतलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pune crime | minor boy attacked by four over fight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update