Pune Crime | …म्हणून अल्पवयीन मुलाने सरपंचाच्या मुलाच्या मदतीने बापाचा केला ‘गेम’, पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

0
397
Pune Crime | Minor Boy Kill Father With The Help Of Friend Who Is Son Of Sarpanch Varvand Yavat Police Station
File Photo

पुणे / दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आईला त्रास देणाऱ्या बापाचा अल्पवयीन मुलाने (Minor) सरपंचाच्या मुलाच्या मदतीने खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड तालुक्यातील वरवंड (Varvand) येथे घडली आहे. राजेंद्र मस्के (Rajendra Muske) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यवत पोलिसांनी (Yavat police) दिलेल्या माहितीनुसार वरवंड येथील राजेंद्र मस्के हे मागील नऊ दिवसांपासून बेपत्ता (Missing) होते. याबाबत त्यांच्या पत्नीने यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) तक्रार दिली होती.

 

दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला (Kedgaon-Choufula) येथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे राजेंद्र मस्के हे गेल्या 9 दिवसांपासून चौफुला येथून अचानक बेपत्ता झाले होते. मात्र त्यांचा मृतदेह (Dead Body) येडशी येथील अभयारण्यात (Yedshi Sanctuary) सापडला असून त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा खून हा त्यांच्या मुलानेच केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आले आहे. (Pune Crime)

 

17 वर्षाच्या मुलाने आपल्याच बापाच्या डोक्यात हातोडा घालून खून केला.
आईला सतत दारु पिऊन बाप मारत असल्याने याचा राग मुलाच्या मनात होता.
याच रागातून जन्मदात्या बापाचा काटा मुलाने काढला.
अल्पवयीन मुलाने त्याचा मित्र संरपंचाचा मुलगा स्वस्तिक संजय खडके Swastika Sanjay Khadke (वय-21 रा. वरवंड) याच्या मदतीने बापाचा खून केला.
यवत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे (API Keshav Wabele) यांनी दिली.

 

Web Title :- Pune Crime | Minor Boy Kill Father With The Help Of Friend Who Is Son Of Sarpanch Varvand Yavat Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा