Pune Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, अल्पवयीन मुलीने नकार देताच….; सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) पाठलाग करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला (Pune Criminals) हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Crime) सोमवारी (दि.21) सकाळी साडेसहाच्या सुमारास सोलापूर रोडवरील (Pune-Solapur Road) बसस्टॉप येथे घडला आहे.

याबाबत 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पीडीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गणेश रोहिदास गजरे (Ganesh Rohidas Gajre) (वय-30 रा. मारुती मंदिराजवळ, साडेसतरानळी, हडपसर) आणि प्रेम भंडारी Prem Bhandari (वय-25 रा. भैरवनाथ मित्र मंडळाजवळ, माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन गणेश रोहिदास गजरे याला अटक केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश गजरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपींनी पीडित मुलीचा पाठलाग केला. तसेच ‘तु पिंट्याच्या नादी लागू नको तो चांगला मुलगा नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला सुखी ठेवेन’ असे म्हणाला असता मुलीने त्याला नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी गणेश याने पीडित मुलीचा हात धरुन तिला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन धमकी (Threat) दिली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मुलीला सतत फोन करुन त्रास दिला. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Minor Girl Molestation Case Hadapsar Police Station Ganesh Rohidas Gajre Arrested


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घट; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | पुण्यातील सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या युवकावर कोयत्याने सपासप वार करुन खून

Samantha Ruth Prabhu | बापरे..! घटस्फोटामुळं समंथाला करावं लागलं ‘हे’ काम..

Smart Phone Addiction | 23.8% मुले बिछान्यात स्मार्टफोनचा करतात वापर, 37.15% गमावत आहेत एकाग्रता – आयटी राज्यमंत्री

Pune Crime | पुण्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघा मेडिकल दुकानदारांना अटक