Pune Crime | औंध गावात मैत्रिणीसोबत पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरातील एका शाळेत 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) झाल्याची घटना (Pune Crime) ताजी असतानाच औंधगावात पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत औंध गावात (Aundh Gaon) राहणाऱ्या 40 वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका नराधमावर 354 आणि पॉक्सो अ‍ॅक्ट (Pocso Act) अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.21) रात्री पावणे आठच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये (Parking) घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच परिसरात राहतात.
सोमवारी संध्याकाळी फिर्यादी यांची 10 वर्षाची मुलगी पार्किंगमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती.
त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला बोलावून घेतले. तिला तुझ्या पप्पांना फोन करु असे बोलून तिला जवळ बोलावले.
फोन करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील चाळे (Pornography) केले. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला.
आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत (API Savita Bhagwat) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Minor girl Molestation Case in Aundh village FIR at Chaturshringi Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा